लोकल प्रवासाची परवानगी द्या, अन्यथा पाच हजार रुपये प्रवास भत्ता द्या

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी
लोकल प्रवासाची परवानगी द्या, अन्यथा पाच हजार रुपये प्रवास भत्ता द्या

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्य सरकारने मुंबई( Mumbai ) आणि उपनगरातील सर्वसामान्य माणसाला लोकल प्रवासाची तात्काळ परवानगी द्यावी ( Demand to Allow local train travel ) अन्यथा सर्वसामान्य माणसाला प्रवास भत्त्यापोटी दरमहा ५ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ( BJP chief spokesperson Keshav Upadhyay ) यांनी सोमवारी केली.

राज्य सरकारने गेली दीड वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार, तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो, त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, असे उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई, ठाणे परिसरातील जनतेने आजवर शिवसेनेला भरभरून साथ दिली. या सर्वसामान्य जनतेची महाआघाडी सरकारला जाणीवच नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच उपनगरी रेल्वे प्रवास बंद असल्याने याची भरपाई राज्य सरकारनेच देण्याची गरज आहे, असे उपाध्ये म्हणाले.

लस खरेदीसाठी राज्य सरकारने सात हजार कोटी रुपये राखून ठेवल्याचे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले होते. हे सात हजार कोटी सामान्य माणसाला प्रवास भत्ता म्हणून द्यावेत आणि सामान्य माणसाच्या संतापाचा उद्रेक टाळावा, असेही उपाध्ये यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com