1 जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी

1 जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी

पुणे (प्रतिनिधि) - पुणे शहरातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे येत्या 1 जूनपासून जीवनावश्यक वस्तूंबरोबरच इतर सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पुणे शहर भाजप व्यापारी आघाडी, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन, गणपती चौक व्यापारी असोसिएशनच्या वतीने महापालिकेकडे केली आहे.

पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर तुळशीबाग व्यापारी असोसिएशन व गणपती चौक व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे यांना निवेदन दिले आहे. याप्रसंगी भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास, प्रसिद्धी प्रमुख संजीव फडतरे, रविंद्र सारुक, अमर देशपांडे, सुनील गेहलोत, केतन अढिया, तुळशीबाग व्यापारी संघटनेचे नितीन पंडीत आदी उपस्थित होते. येत्या दोन ते तीन दिवसांत यासंबंधी निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुणे शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. आता कोरोनाची लाट ओसरते आहे. व्यापारी वर्गाने कोरोनाचा संसर्ग जास्त होत असताना लॉकडाऊन करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयास सहकार्य केले. खरं तर, व्यापारी वर्गाचे प्रचंड आर्थिक नुकसान याकाळात झाले आहे. त्यास पुन्हा उभारी घेण्यासाठी आता दुकाने सुरु करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या १ जूनपासून इतर व्यवसायाची दुकाने व व्यापार सुरु करण्यास महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडी, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन व गणपती चौक व्यापारी आघाडीने यावेळी ही मागणी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com