पुण्यातील सर्व दुकाने उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडणार

पुण्यातील सर्व दुकाने उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडणार

पुणे (प्रतिनिधि) - करोनाच्या दुसऱ्या लाटेचा झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यन्त वाढवण्यात आला आहे. त्याचवेळी ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या आटोक्यात आली आहे त्याठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. पुण्यातील गेल्या काही दिवसातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती लोकसंख्या पाहता, व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने सुरू करण्याची आणि दुकानांची उघडे ठेवण्याची वेळ वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुण्यातील सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परबंगी देण्यात आली आहे. शनिवारी रविवारी मात्र केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने उघडी राहणार आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील. तर, शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. याशिवाय, शहरातील उद्यानं, व्यामशाळा (जिम) बंद राहणार आहेत. तर हॉटल आणि बार उघडे राहणार असले तर तिथे फक्त पार्सल सेवा सुरू राहणार आहे.

पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश असणार आहे. आता २ वाजेपर्यंत नागरिकांच्या दृष्टीने सर्व सेवा सुरू राहणार आहेत. त्यानंतर दुपारी तीननंतर शहरात संचारबंदी असेल. त्यामुके त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. पीएमपीएमएल बस सेवा फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही असे मोहोळ यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com