मामाच्या  साखर कारखान्यावर ईडीची कारवाई ; अजितदादा म्हणाले...

मामाच्या साखर कारखान्यावर ईडीची कारवाई ; अजितदादा म्हणाले...

पुणे / Pune - महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळा प्रकरणात ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Deputy CM Ajit Pawar) मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या सातार्‍यातील जरंडेश्‍वर कारखान्यावर (Jarandeshwar Sugar Mills) जप्तीची कारवाई केली आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. ईडीकडून येथे झालेल्या कारवाईशी माझा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले. Maharashtra State Co-operative Bank (MSCB) scam case

जरंडेश्‍ववर कारखाना माझ्याच नातेवाईकांचा आहे. ईडीला (Enforcement Directorate (ED)) चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीबीआयने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन जरंडेश्‍वरद्वारे न्यायालयासाठी अपील केले जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अजित पवार यांनी या कारखान्याच्या खरेदी-विक्रीसह कारखान्याच्या नफ्या-तोट्याचीही माहिती दिली. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्‍वर कारखाना होता. 2016 आणि 2017 मध्ये सर्व रितसर परवानग्या घेतल्या होत्या. माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जातील, असं अजितदादा म्हणाले.

जरंडेश्‍वर कारखान्यावर टाच आली हे खरे आहे. मला कारखान्यावर कारवाई झाल्याचं मला माहीत नव्हतं. रात्री मला माहीत झालं. कायदेशीर प्रक्रिया राबवूनच या कारखान्याची विक्री करण्यात आली होती. त्यासाठी टेंडरही काढण्यात आलं होतं. सर्वादिक बोली लागल्यानंतरच कारखान्याची विक्री करण्यात आली होती. त्यासाठी गुरु कमोडिटी या कंपनीने सर्वाधिक बोली लावली होती, असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, जरंडेश्‍वर साखर कारखाना पूर्वी सहकारी कारखाना होता. मात्र, महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. नंतर तो कारखाना खासगीरित्या विकत घेतला गेला. सध्या अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत होते. त्यामुळे आता अजित पवारांचीही ईडी चौकशी होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

मामाच्या  साखर कारखान्यावर ईडीची कारवाई ; अजितदादा म्हणाले...
शेतकर्‍यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही - मुख्यमंत्री

यामागचं गौडबंगाल जनतेला माहीत आहे

सत्तेवर आलेल्या पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्याचा ठराव भाजपने केला आहे. सीबीआय चौकशीचा असा ठराव करता येतो का? स्वातंत्र्यानंतर असं पहिल्यांदा घडलंय. मात्र, कुठल्याही पक्षाला ते अधिकार आहेत. फक्त चौकशी पारदर्शक झाली पाहिजे, यामागचं गौडबंगाल काय आहे जनतेला माहीत आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

मामाच्या  साखर कारखान्यावर ईडीची कारवाई ; अजितदादा म्हणाले...
विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com