पुणे (प्रतिनिधी) -

पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये राजकीय नेत्यांनी त्यांचे सर्व प्रकारचे राजकीय, सामाजिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले होते.

मात्र, त्यांच्या या आवाहनाला राष्ट्रवादीच्या नेत्यानेच हरताळ फासण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात चक्क लावण्यांचा कार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप मनसेचे कसबा अध्यक्ष गणेश भोकरे यांनी केला आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली

आहे. राजकारण्यांनी कोणताही कार्यक्रम घेवु नये तसेच त्याला हजेरी लावु नये असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. असे असताना बालगंधर्व रंगमंदिरात हा लावण्यांचा कार्यक्रम रंगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, हा कार्यक्रम बालगंधर्व सुरू असल्याची माहिती मनसेला मिळाली.

त्यांनी बालगंधर्व गाठत हा कार्यक्रम बंद पडला. राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा वाढदिवस याठिकाणी साजरा झाला आहे. अजित पवार यांचा आदेश धुडकावण्यात आला आहे. त्यामुळे कारवाई करावी अशी मागणी भोकरे यांनी केली आहे.