मुंबई -

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेत राज्यातील इतर जिल्ह्यांतही करोना

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: ग्रामीण भागात कोरोना रुग्णवाढ होेत आहे. अजित पवार यांनी त्यावर बोट ठेवत पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पुन्हा एकदा अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरात लॉकडाऊन लावायचा विचार सुरु आहे. अमरावतीत मुंबईपेक्षा जास्त रुग्णसंख्या दिसत असून अमरावती विभागात जास्त रुग्णसंखेत वाढ होत असल्याचे समोर आल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन या तीन जिल्ह्यांत लावण्याचा विचार करत आहोत.

सध्या अकोला, यवतमाळ आणि अमरावतीत काय परिस्थिती आहे याबाबत अढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर या तीन जिल्ह्यांत काय निर्णय घेणार हे समोर येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, अकोला, अमरावती आणि यवतमाळच्या पालकमंत्र्यांशी लॉकडाऊनबाबत माझे बोलणं झाल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे.