‘सीसीटीएनएस’ तपास प्रणालीत अहमदनगर जिल्हा राज्यात प्रथम

पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडून पथकाचा गौरव
‘सीसीटीएनएस’ तपास प्रणालीत अहमदनगर जिल्हा राज्यात प्रथम

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टममध्ये (सीसीटीएनएस) Crime and Criminal Tracking Network & Systems (CCTNS) जिल्हा पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

पोलीस तपासामध्ये मदतीसाठी 2015 पासून सीसीटीएनएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामध्ये उत्कष्ठ कामगिरी केल्याबद्दल अधीक्षक पाटील यांच्याहस्ते सीसीटीएनएस विभागातील सहायक फौजदार आर. डी. बारवकर, एस. एस. जोशी, पोलीस नाईक ए. के. गोलवड, आर.व्ही. जाधव, एस.एस. काळे, के.पी. ठुबे, एस.ए. भागवत, टी. एल. दराडे, अभियंता अंबादास शिंगे या पथकाचा गौरव करण्यात आला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अधीक्षक पाटील बोलत होते.

ते म्हणाले, महिला, बालकांविरोधात दाखल अत्याचाराच्या गुन्ह्यांचा वेळेत तपास पूर्ण करून त्याची सीसीटीएनएस प्रणालीमध्ये नोंद होण्यासाठी गृह मंत्रालयाने 2018 पासून आयटीएसएसओ पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील 48 युनिटमधून 211 पैकी नगरने 197 गुण मिळवून प्रथक क्रमांक मिळविला आहे. या प्रणालीत नगरचा एप्रिल महिन्यांत तिसरा क्रमांक आला होता. यामध्ये आणखी उत्कृष्ठ कामकाज झाल्याने राज्यात प्रथम येण्याचा मान नगरला मिळाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी ही कामगिरी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com