"प्रमोटेड कोविड-19" चा शिक्का असलेल्या गुणपत्रिकाची कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडून गंभीर दखल

गुणपत्रिकावर प्रमोटेड कोविड-19 शिक्का नसेल; कृषिमंत्र्याचे आश्वासन
कृषीमंत्री दादा भुसे
कृषीमंत्री दादा भुसे

मुंबई | Mumbai

काही दिवसापूर्वी कृषी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-19 असा शिक्का आढळून आला होता. राज्य शासनाने असे कोणतेही आदेश दिलेला नसताना तसा उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणाची कृषीमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच राज्य शासनाने असे कोणतेही आदेश दिलेला नसतानाही तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून त्यांची कारवाई करण्याचे महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला निर्देश दिले आहे.

अकोला कृषी विद्यापीठा अंतर्गत अमरावती कृषी विद्यालयामधील 247 विद्यार्थ्यांना कोविड-19 असा उल्लेख असलेल्या गुणपत्रिका देण्यात आल्या होत्या. आता याप्रकरणी कृषी मंत्र्यांनी चौकशी आदेश दिले असून विद्यार्थ्यांना दिलेली प्रमाणपत्र परत घेऊन नवीन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं आश्वासन पालक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com