नाशिकपाठोपाठ पुण्यातही आगडोंब! गोदामाला भीषण आग

नाशिकपाठोपाठ पुण्यातही आगडोंब! गोदामाला भीषण आग

पुणे | Pune

पुण्यातील वडगाव शेरी परिसरामध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. एका गोदामाला अचानक भीषण आग लागली...

या आगीनंतर सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-नगर मार्गावर वडगाव शेरी परिसरातील सोपान नगरमध्ये ही घटना घडली आहे. या सोपन नगरमध्ये एका गोडाऊनला भीषण आग लागली. स्क्रॅप गोडाऊनला ही आग लागली आहे. या ठिकाणी 3 कुटुंब राहत होती. त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे.

नाशिकपाठोपाठ पुण्यातही आगडोंब! गोदामाला भीषण आग
नाशिक : फर्निचर गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

स्क्रॅपच्या गोडाऊनमध्ये सिलेंडर होते. एकापाठोपाठ अनेक सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने वेळीच सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाकडून 5 वाहने दाखल झाली. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com