अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकूने हल्ला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकूने हल्ला

पुणे |प्रतिनिधि| Pune

'नटरंग' फेम प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडील मनोहर कुलकर्णी (वय 63) यांच्यावर एका माथेफिरूने घरात घुसून चाकूने वार करीत हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडल्याने खळबळ उडाली. कुलकर्णी या हल्यात जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी 24 वर्षीय अजय शेगटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आरोपी अजय शेगटे सकाळी अचानक सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते. सोनालीच्या वडिलांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माथेफिरु अजयने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झाले आहेत. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार कुलकर्णींनी पोलिसांकडे दिली आहे.

कुलकर्णीच्या इमारतीतील रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यानंतर पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत अजयला ताब्यात घेतले अजय आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचं सांगतो. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सोनाली कुलकर्णीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर आहेत. त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात जवळपास तीस वर्षे काम केले आहे. तिच्या आई सविंदर या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD (सेन्ट्रल ऑर्डनन्स डेपो)) येथे काम केले आहे.

सोनाली नुकताच विवाहबंधनात अडकली आहे. तिने कुणाल बेनोडेकरसोबत दुबईमध्ये लग्न केलं. यावेळी लग्नासाठी मोजकी मंडळी उपस्थित होती. कुणाल लंडनचा आहे. त्याचे संपूर्ण कुटुंबीयदेखील लंडनला असतात. पण, तो कामानिमित्त दुबईत असतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com