गरजेनुसार रेमडेसिवीर अथवा ऑक्सिजनचा वापर न करणार्‍या रूग्णालयांवर कारवाई करावी - अजित पवार

गरजेनुसार रेमडेसिवीर अथवा ऑक्सिजनचा वापर  न करणार्‍या रूग्णालयांवर कारवाई  करावी - अजित पवार

पुणे (प्रतिनिधि) -

गरजेनुसार ऑक्सिजनचा वापर करण्यात यावा. खासगी रूग्णालयामध्ये गरजेनुसार रेमडेसिवीर अथवा ऑक्सिजनचा वापर होत नसेल तर अशा रूग्णालयांवर तपासणी पथक नेमून

कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. त्यामुळे गरज नसताना रेमडेसिवीर, अक्सिजनसाठी रूग्ण व नातेवाईकांची कोंडी करणाऱ्या खासगी रूग्णालयांवर आता तपासणी पथकाची करडी नजर राहणार आहे.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात 'कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठक शुक्रवारी (दि. १६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, की या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवावेच लागेल. शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि बारामतीतील नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाच्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळवू.

सद्यस्थितीत बारामती शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत. नागरिकांकडून त्या निबंर्धांचे पालन केले जाईल, यासाठी दक्ष राहून काम करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

रेमडेसीवीरच्या मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त - जिल्हाधिकारी

जिल्ह्यात रेमडेसीवीरच्या मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त आहे. ही वस्तुस्थिती आहे.परंतु डॉक्टरांनी सर्व रुग्णांना हे इंजेक्शन देण्याऐवजी टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार इंजेक्शन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.

बारामतीत शुक्रवारी (दि.१६) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना निर्मुलन आढावा बैठक पार पडली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ.देशमुख माध्यमांशी बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, स्टॉकिस्ट व हॉस्पिटलकडून सध्या ४२ हजार इंजेक्शनची मागणी आहे.परंतु जिल्ह्यात कोअर कमिटीने निर्णय घेतल्यानुसार थेट हॉस्पिटललाच आपण इंजेक्शन पुरवठा करत आहोत. त्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण समिती स्थापन्यात आली आहे.

उपजिल्हाधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी, एफडीएचे अधिकारी त्या कामात आहेत.मागील तीन दिवसात १२ हजार इंजेक्शन्स हॉस्पिटलला दिली आहेत.रेमडेसिविरच्या निर्यातीला केंद्राकडून बंदी घालण्यात आली असून गुरुवारी दिल्लीहून विमानाने ३५०० इंजेक्शन पुण्यात आणली असुन ती पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राला देण्यात आली आहेत. हॉस्पिटलची मागणी व रुग्णसंख्या गृहित धरून इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com