धान प्रतवारीत गैरप्रकार आढळल्यास कारवाई

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा
धान प्रतवारीत गैरप्रकार आढळल्यास कारवाई

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

धानाची प्रतवारी ( paddy grading )आणि इतर बाबींसाठी राज्यस्तरीय भरारी पथकामार्फत ( State level flying squad ) तपासणी केली जाणार असून तपासणीदरम्यान गैरप्रकार आढळल्यास सर्व संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal ) यांनी सोमवारी दिला.

पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत धान आणि भरड धान्य खरेदी पूर्व नियोजनाची बैठक आज मंत्रालयात भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला विभागाचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य सहकारी आणि पणन महासंघ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग,सर्व विभागांचे पुरवठा उपायुक्त तसेच दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

धानाची प्रतवारी आणि इतर बाबींसाठी राज्यस्तरीय भरारी पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकाकडून प्रत्यक्ष स्थळी भेट देवून सर्व बाबींची तपासणी केली जाईल.या पथकाला तपासणीदरम्यान गैरप्रकार आढळल्यास सर्व संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल असे भुजबळ यांनी सांगितले.

धान खरेदी केंद्राची( Crop Buying Centers ) संख्या या हंगामात वाढवून धानखरेदी वेळेवर करा. धान खरेदी आणि धानभरडाई प्रक्रियेबाबत अंदाजित वेळापत्रक तयार करून वेळापत्रकाप्रमाणेच प्रक्रिया पार पडेल अशी खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही भुजबळ यांनी दिले.

पणन हंगाम २०२०-२०२१ मध्ये अनेक महत्वाचे निर्णय सरकारकडून घेण्यात आले असून त्यात ऑनलाईन सातबारा, बाहेरील राज्यातून धान येणार नाही यासाठी राज्याच्या सीमा बंद करणे,धानाची गुणवत्ता यंत्रणेमार्फत तपासून घेणे आदींचा यात समावेश असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

बारदानाच्या आवश्यकतेबाबत शासन स्तरावरून माहिती संकलित करण्यात येवून प्रक्रिया लवकर मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून बारदाना व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यात येईल अशा सूचनाही भुजबळ यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com