
बुलढाणा | Buldhana
उद्घाटानापासूनच समृद्धी महामार्गावर (samruddhi Highway) अपघातांची मालिका अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत अनेकांनी या महामार्गावर अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहे.
रविवारी बुलढाण्याजवळील (buldhana) सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू घटना घडली आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघात दोन लहान मुलांसह तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा इथं मारुती सुझुकी आर्टिगा गाडीचा भीषण अपघात झाला. वेगात असलेली गाडी अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भरधाव वेगात असलेली आर्टिगा कार अचानक चालकाकडून अनियंत्रित झाली. त्यामुळे कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.
हा महामार्ग सध्या नागपूर ते शिर्डी पर्यंत सुरू झालेला असून लवकरच दुसरा ४४ किमीचा टप्पा सिन्नरपर्यंत सुरू होणार असल्याचे समजते. पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका लागण्याआधी समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करून हा महामार्ग सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या सिन्नरपासून इगतपुरीपर्यंत घाट सेक्शन असल्याने काम सुरू आहे.