समृद्धी महामार्ग की अपघातांचा रनवे! खासगी बस उलटली; एकाचा मृत्यू, २० जण जखमी

समृद्धी महामार्ग की अपघातांचा रनवे! खासगी बस उलटली; एकाचा मृत्यू, २० जण जखमी

बुलडाणा | Buldhana

पंतप्रधानांनी लोकार्पण केलेला समृद्धी महामार्गावर (Samruddhi Express Way) अपघातांचा सिलसिला सुरूच आहे. आज शुक्रवारी पहाटे खाजगी बस उलटून किमान २० प्रवासी जखमी झाले. या बसमधून बाहेर निघून उभ्या असलेल्या दोघाना अन्य भरधाव वाहनाने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या राही ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, बसमधून प्रवासी बाहेर पडत होते. यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले.

समृद्धी महामार्ग की अपघातांचा रनवे! खासगी बस उलटली; एकाचा मृत्यू, २० जण जखमी
Samruddhi Mahamarg Photo : समृद्धी महामार्गाचे 'हे' खास फोटो पाहिलेत का?

अपघातानंतर खासगी बस समृद्धी महामार्गाच्या मध्यभागी पलटली झाली. अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर पडत होते. हे प्रवासी महामार्गाच्या बाजूला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले , एक प्रवासी जागीच ठार तर एक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. या ठिकाणी सातत्यानं अपघात होत आहेत. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. या महामार्गाचं लोकार्पण झाल्यापासूनच या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळं हा समृद्धी महामार्ग हा अपघातांचा महामार्ग झाला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

समृद्धी महामार्ग की अपघातांचा रनवे! खासगी बस उलटली; एकाचा मृत्यू, २० जण जखमी
समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच; भीषण अपघातात चिमुकलीसह महिलेचा मृत्यू

दरम्यान दुसऱ्या एका अपघातात एकाचा मृत्यू झाला. राहता - शिर्डीनाजिक अवजड कंटेनर आणि कारच्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला. अहमदनगर मनमाड महामार्गावर शिर्डी नजीक झालेल्या अवजड कंटेनर आणि कारच्या अपघातात रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ प्राचार्य राजेंद्र बर्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात बर्डे यांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com