नगर-कल्याण महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार

नगर-कल्याण महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार

पुणे | Pune

राज्यातील महामार्गावरील अपघाताचे सत्र चालूच आहे. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. नगर-कल्याण महामार्गावर हा अपघात झाला असून यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या दोन जणांवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे तर पिकअप वाहन हे कल्याणच्या दिशेने जात होते. इनोव्हाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. इनोव्हा आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक बसली त्यावेळी इनोव्हाची एअर बॅग तुटून बाजुला पडल्याचे वृत्त आहे. अपघात रात्री झाला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

नगर-कल्याण महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी कनेक्शन, माजी स्वीय सहाय्यकांचा आरोप

मागच्या आठवड्यात आळेफाट्याजवळील अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच हा भीषण अपघात झाला. नगर-कल्याण महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असून अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने वाहनचालकांकडून रस्ते नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नगर-कल्याण महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार
धक्कादायक! क्षुल्लक कारणावरुन वाद, माथेफिरूने धावत्या रेल्वेत सहप्रवाशांनाच पेटवलं... लहानग्यासह तिघांचा मृत्यू

रात्रीच्या वेळी प्रवास करताना अतिवेगाने गाडी चालवणे टाळावे. यामुळे तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. तसेच गाडीच्या विंडशील्ड नीट साफ करा. विंडशील्ड खराब असतील तर त्यामुळे रात्री गाडी चालवताना खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्री गाडी चालवण्यापूर्वी आरसे नीट स्वच्छ करा.

नगर-कल्याण महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार
Congress च्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान नेत्यांसह स्टेज अचानक कोसळला... Video Viral
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com