मुंबई -

राज्यात करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून मुंबईत लवकरच पुन्हा एकदा ‘नाईट लाईफ’ सुरु होईल अशी माहिती पर्यावरण

मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे मिशन बिगीन अंतर्गत हळूहळू सर्व बाबी सुरु केल्या, त्यामुळे नाईटलाईफ देखील लवकरच सुरु करु, रेस्टॉरंटही रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत 26 जानेवारी 2020 रोजी नाईट लाईफची सुरुवात झाली. मात्र कोरोनामुळे ही नाईट लाईफ योजना कुठेतरी बारगळी. मात्र आता पुन्हा मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्यासाठी आदित्य ठाकरे सरसावले आहेत.

याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आता आपण रेस्टॉरंटला 1 पर्यंत सुरु करण्याची परवानगी दिली आहे. हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, अजूनपर्यत तरी कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नाईट लाईफ देखील लवकरच सुरू करू असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी रेस्टॉरंटना रात्री 1 वाजेपर्यंत सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्याच्या निर्णयालाही अधोरेखित केलं.

नाईट लाईफ संकल्पनेनूसार मुंबईत बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर 24 तास खुले ठेवण्याची त्यात परवानगी देण्यात आली होती. हे सर्व त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा नाईटलाईफ सुरु होणार असल्याने आदित्य ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने हे पहिले पाऊल पडले आहे. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स 24 तास सुरु राहू शकतात. ज्यांची इच्छा असेल ते 24 तास व्यवसाय करु शकतात.