कचऱ्याची विल्हेवाट लावताना कंपनीत भीषण स्फोट; एकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

कचऱ्याची विल्हेवाट लावताना कंपनीत भीषण स्फोट; एकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

नागपूर | Nagpur

नागपूरमधून (Nagpur) एक दुर्देवी घटना समोर आली आहे. नागपूर जवळील बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत (Economy Explosive Company) आज (१३, ऑगस्ट) भीषण आग लागली (Fire In Company). या आगीमध्ये एका कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.

प्रतीक नंदू कळसकर २१ रा.हेटी (कन्नमवारग्राम) ता.कारंजा, जि.वर्धा असे मृताचे नाव आहे. सुनील शांताराम शेंदरे (वय २३ रा.अडेगाव ),अमोल मेश्राम व सोनवने अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखल होत जखमींना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

कचऱ्याची विल्हेवाट लावताना कंपनीत भीषण स्फोट; एकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू
मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन करण्यासाठी इथे क्लिक करा...

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर जवळील बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण आगीची घटना समोर आली आहे. इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीने उत्पादित केलेल्या टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावत ते नष्ट करत असताना आग लागली.सकाळी पावणेसातच्या सुमारास अचानक या साहित्यातून आगीच्या ज्वाळा निघाल्या. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावणारे दोन कामगार गंभीर जखमी झाले.

कचऱ्याची विल्हेवाट लावताना कंपनीत भीषण स्फोट; एकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू
Shirdi : सलग सुट्ट्यांमुळे दुमदुमली शिर्डी, साईंच्या दरबारी भाविकांची तुफान गर्दी

घटनेची माहिती मिळताच काटोलचे उपविभागीय अधिकारी बापूसाहेब रोहोम, ठाणेदार पंकज वाघोडे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com