
नागपूर | Nagpur
सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू आहे. विरोधकांकडून विविध विषय उपस्थित करून सत्ताधाऱ्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी देखील विरोधकांना तोडीस तोड उत्तर देत असल्याने अधिवेशनाचे आतापर्यंतचे सर्वच दिवस वादळी ठरले आहेत...
विरोधकांकडून महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा देखील सभागृहात उपस्थित करण्यात आला आहे. मात्र हे सर्व सुरू असताना आज विधिमंडळाच्या का महिलेने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
कविता चव्हाण (Kavita Chavhan) असे या महिलेचे नाव आहे. महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी या महिलेने असे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना वेळीच सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.