सायबर चोरांचा जेष्ठ नागरिकास पावणेचार लाखांचा गंडा

डेटींगचा मोह न आवरल्याने जाळ्यात
सायबर चोरांचा जेष्ठ नागरिकास पावणेचार लाखांचा गंडा

पुणे (प्रतिनिधि) -

‘वय गेलं पण सोय नाही आली’ असं म्हणतात. त्याची प्रचिती तर आलीच परंतु 68 वर्षांच्या

जेष्ठ नांगरिकास या वयातही डेटींगचा मोह न आवरल्याने ते सायबर चोरांच्या जाळ्यात अडकले आणि सायबर चोरांनी या जेष्ठ नांगरिकास तब्बल पावणेचार लांखाला गंडा घातला. ही घटना पुण्यातील क्वार्टर गेट या भागत घडली. याबाबत या जेष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

त्याचे असे झाले, ही आजोबा घरी असताना त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने त्यांना डेटींगसाथी मुली पुरविण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी आजोबांना विविध कारण सांगून एका साईटवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यासाठी त्यांना एका बँक खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. आजोबाही तसेच करत गेले सायबर चोरांच्या जाळ्यात अडकले. त्यांनी पैसे पाठवल्यावर त्यांना दुसऱ्या मोबाइलवरुण संपर्क साधण्यात आला. तुम्ही आता रजिस्टेशन केले असल्याने तुमच्यावर पोलीस गुन्हा दाखल करतील, अशी भिती दाखवून हे रजिस्टेशन रद्द

करायचा असेल तर आणखी पैसे पाठविण्यास भाग पडले. अशाप्रकारे त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये बँक खात्यावर भरण्यास भाग पाडले. त्यानंतरही त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली जाऊ लागली. तेव्हा त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com