
बीड | Beed
येथील दीड वर्षीय चिमुकलीचा चौथ्या मजल्यावरून खेळता खेळता पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरक्शा रईसोद्दीन कुरेशी असे तिचे नाव आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड (Beed) शहरातील झमझम कॉलनी येथे रईसोद्दीन झियाओद्दीन कुरेशी हे वास्तव्यास आहे. त्यांची मुलगी दरक्शा कुरेशी ही सकाळी खेळत होती.
यावेळी अचानक तिचा तोल गेल्याने चौथ्या मजल्यावरून ती थेट खाली पडली. यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी बीड शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.