महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई; आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक

महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई; आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक

मुंबई (Mumbai)

गणेशोत्सवाच्या काळात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अटक केलेल्या एका दहशतवाद्याचे मुंबई कनेक्शन (Mumbai connection of terrorists) उघड झाले होते. जान मोहम्मद अली शेख (Jan Mohammad Ali Sheikh) यांचा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं (Delhi Police special squad) अटक केली होती.

दरम्यान, एटीएस आणि गुन्हे शाखेने (Maharashtra ATS and Mumbai Police Crime Branch) केलेल्या एकत्रित कारवाईत शुक्रवारी रात्री जोगेश्वरी (Jogeshwari) येथून एकाला ताब्यात घेण्यात आलं. जाकीर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे कनेक्शन दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्यांसोबत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतकंच नाही तर संशयित व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधित असून, तो जान मोहम्मद याचा हँडलर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएस आणि क्राईम ब्रांचकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे.जाकीर हा जान मोहमद याच्या संपर्कात होता. जाकीरने जान मोहमदला मुंबईत हत्यार आणण्यासाठी सांगितलं, असा पोलिसांना संशय आहे.

जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई एटीएस जाकीर हुसेन शेखच्या मागावर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी जाकीर शेख हा मुंब्रामध्ये सुरक्षित जागा शोधत होता. त्याने त्याच्या पत्नीला वांद्रे येथील एका नातेवाईकाकडे ठेवलं होतं. याची माहिती मिळताच एटीएसने सापळा रचला. जाकीरच्या पत्नीला त्याला फोन करायला सांगून त्याला एका ठिकाणी भेटायला बोलावलं आणि त्याला ताब्यात घेतलं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com