शाळेत घुसून दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीवर चाकूने केले सपासप वार

शाळेत घुसून दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीवर चाकूने केले सपासप वार

पुणे |प्रतिनिधी| Pune

एका माथेफिरू तरुणाने पुण्यातील वडगाव शेरी येथील शाळेत घुसून दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीवर चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली असून परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने हा हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर सिटी हॉस्पिटल वडगाव शेरी याठिकाणी उपचार सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (१४ मार्च) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वडगावशेरी येथील एका शाळेत हा सर्व प्रकार घडला. एका कार्यक्रमाचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले होते. हा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक एक मुलगा जबरदस्तीने शाळेच्या आवारात आला. त्यानंतर त्याने एका मुलीवर चाकूने सपासप वार केले.

आरोपी तरुण कोणाला काही कळण्याआधीच या मुलीवर हल्ला करुन पसार झाला. या घटनेत ती तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणीवर उपचार सुरू असून ती उपचाराला प्रतिसाद देत आहे. सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या आधारे पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com