मुंबईत चार मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

मुंबईत चार मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

मुंबई | Mumbai

मुंबईतील बोरिवली पश्चिममध्ये चार मजली इमारत कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार बोरिवली पश्चिममधील साईबाबा नगर येथील साईबाबा मंदिराजवळ असलेली ४ मजली इमारत दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी कोसळली. ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत याची माहिती अद्याप कळू शकली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com