मास्क न वापरणाऱ्यांकडून ५१ कोटींचा दंड वसूल

मुंबई महानगरपालिकेची कारवाई
मास्क न वापरणाऱ्यांकडून ५१ कोटींचा दंड वसूल

मुंबई | Mumbai

मुंबई महापालिका एप्रिल 2020 पासून आतापर्यंत मुंबई महापालिकेने मास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांकडून तब्बल ५१.४६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. २५ लाख ५३ हजार ५४६ मुंबईकरांकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान राज्यातील मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने कारवाई करत कोटींचा दंड वसूल केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com