
चंद्रपूर | Chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे मालगाडीच्या इंजिनावर बिबट्याचा (leopard) मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. येथील 'घुग्घुस न्यू रेल्वे कोल सायडिंग' भागात ही घटना समोर आली असून याची वन विभाग आणि रेल्वे प्रसासनाने गंभीर दखल घेतली आहे.
सकाळच्या सुमारास एक मालगाडी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधून कोल सायडिंगमध्ये (Chandrapur Thermal Power Station) दाखल झाली असता, इंजिनाच्या वरच्या भागावर एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.
चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन परिसरात मोठया प्रमाणात वन्यजीवांचा वावर असतो. त्यामुळे मालगाडीच्या वरच्या भागावर चढलेल्या बिबट्याचा तीव्र दाबाच्या वीज प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श होऊन, विजेच्या (electricity) तीव्र धक्क्यामुळे त्या बिबट्याचा मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे; मात्र या घटनेमागील सत्यता समोर यावी म्हणून, वनविभाग (Forest Department) आणि रेल्वे प्रशासन अधिक तपास करत आहेत.