श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे ९ वे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवा यांचे करोनामुळे निधन

श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे ९ वे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवा यांचे करोनामुळे निधन

पुणे(प्रतिनिधि)

श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे ९ वे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवा यांचे करोनामुळे मंगळवारी दुःखद निधन झाले.

काही दिवसांपूर्वी महेंद्र पेशवे यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती उपचारादरम्यान खालावली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

बाजीराव पेशवे यांचे श्रीमंत महेंद्र पेशवे हे ९ वे वंशज होते. पुणे शहरातच त्यांचे वास्तव्य होते. तसेच ते महाराष्ट्रातील राजघराण्यांना एकत्र आणत स्थापन करण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्य महासंघाचे कार्याध्यक्ष होते. पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना महेंद्र पेशवे यांनाही करोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com