नववी व अकरावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा होणार
महाराष्ट्र

नववी व अकरावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा होणार

विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत

Nilesh Jadhav

संगमनेर | वार्ताहर | Sangmner

करोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. शासनाने धोरण घेऊन या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याचे आदेशित केले होते. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले असले तरी नववी, अकरावीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

द्वितीय सत्राच्या परीक्षा होऊ न शकल्यामुळे प्रथम सत्र व द्वितीय सत्रातील झालेला चाचण्या तोंडी परीक्षाच्या आधारे गुण देण्याचे निर्देशित करण्यात आले होते. तथापि तरीदेखील नववी व अकरावीच्या वर्गात विद्यार्थी नापास झालेले असतील अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन स्वरूपात किंवा प्रत्यक्ष महाविद्यालयात बोलावत या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा यापूर्वी जुलै अखेरच पुर्ण करण्यात येत होती. तथापि करोनामुळे या परीक्षेची मुदत वाढविण्यात आली असून आता या परीक्षा सात ऑगस्टपर्यंत पूर्ण करावयाच्या आहेत. त्यामुळे नववी व अकरावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात प्रवेशित होता येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com