करोना
करोना
महाराष्ट्र

राज्यातील ९,२१७ पोलिसांना करोनाची लागण

मागील २४ तासांत १२१ नवे रुग्ण

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई | Mumbai

करोना व्हायरस संकट काळात जीवाची पर्वा न करता कार्यरत असणारे पोलिस कोविड-19 च्या कचाट्यात सापडले आहेत. मागील 24 तासांत 121 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून 2 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलातील करोना बाधित पोलिसांची संख्या 9 हजार 217 वर पोहचली आहे.

त्यापैकी 7 हजार 176 पोलिस करोना संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर अद्याप 1 हजार 939 करोना बाधित पोलिसांवर उपचार सुरु आहेत. एकूण 102 पोलिसांना कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत.

करोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तर अनेकदा कर्तव्यापलिकडे जात नागरिकांची मदत केली आहे.

दरम्यान, कोविड-19 काळात पोलिसांनी नेमके कसे काम केले, हे दाखवणारी डॉक्युमेंटरी पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केली आहे.

महाराष्ट्रातील करोना बाधितांचा आकडा 2,54,427 वर पोहचला असून त्यापैकी 1,40,325 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तर 1,03,516 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com