मुंबईत आज करोनाचे 910 नवे रुग्ण; 57 मृत्यू
महाराष्ट्र

मुंबईत आज करोनाचे 910 नवे रुग्ण; 57 मृत्यू

बाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 165 वर

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

मुंबईमध्ये 910 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 165 वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 6645 वर पोहचला आहे. coronavirus

मृतांमध्ये 37 पुरुष तर 20 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 2 जणांचे य 40 वर्षांखाली आहे. 30 जण हे 60 वर्षांवरील, तर 25 जण हे 40 ते 60 वर्षादरम्यान होते.

मुंबईत आज कोरोनाच्या 988 रुग्णांना घरी सोडण्यात आल.े आतापर्यंत मुंबईतून तब्बल 92 हजार 661 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्के आहे. तर शहरात 20 हजार 562 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com