‘त्या’ 727 पोलीस अधिकार्‍यांची मुंबईबाहेर बदली

‘त्या’ 727 पोलीस अधिकार्‍यांची मुंबईबाहेर बदली

मुंबई / Mumbai - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडलेली स्फोटके आणि त्यात सचिन वाझेंसह इतरही काही पोलीस अधिकार्‍यांचा हात, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब ते नुकतीच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना झालेली अटक यामुळे मुंबई पोलीसांच्या कार्यक्षमतेबद्दल संशयाचे वातवरण निर्माण झालेले असताना आता राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Director General of Police Sanjay Pandey)

मुंबई पोलीस (Mumbai police) दलात 8 वर्षांहून अधिक काळ सेवा देणारे पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या मुंबईच्या बाहेर बदल्या करण्यात येणार आहेत. यासाठीची यादी देखील तयार करण्यात आली आहे.

पोलीस दलातील नियमाप्रमाणे एका जिल्ह्यामध्ये सलग आठ वर्षे सेवा दिल्यानंतर दुसर्‍या जिल्ह्यात बदली केली जाते. याच नियमानुसार मुंबई पोलीस दलातील 727 अधिकार्‍यांची इतर जिल्ह्यांमध्ये बदली केली जाणार आहे.

यामध्ये 89 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 253 निरीक्षक, 375 सहाय्यक निरीक्षक आणि 10 उपनिरीक्षकांचा समावेश असल्याचं कळतंय. या अधिकार्‍यांना त्यांच्या आवडीच्या तीन जिल्ह्यांची बदलीसाठी निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तीनपैकी एक जिल्हा त्यांचा मूळ जिल्हा ठेवण्याची मुभा देखील देण्यात आल्याचे समजते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com