मुंबई | Mumbai
करोनाचा कहर हळूहळू कमी होतांना दिसून येत आहे. राज्यात आज सात हजार ८९ करोना बाधितांची नोंद झाली असून त्याच्या दुप्पट रुग्ण झाले बरे झाले आहेत.
करोना विषाणूच्या बाबतील महाराष्ट्र हे देशात सर्वात बाधित राज्य आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये १५ हजाराच्या वर संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र आज करोना बाधितांची संख्या आता ५ अंकावरून ४ अंकावर आली आहे.
राज्यात आज ७ हजार ८९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन १५ हजार ६५६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
अशाप्रकारे आतापर्यंत एकूण १२ लाख ८१ हजार ८९६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या २ लाख १२ हजार ४३९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.