पोलीस खात्यातील 5,200 जागा 31 डिसेंबरपूर्वी भरणार

गृहमंत्र्यांची घोषणा
पोलीस खात्यातील 5,200 जागा 31 डिसेंबरपूर्वी भरणार

औरंगाबाद / Aurangabad - महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार असून, पहिल्या टप्प्यातील 5,200 पदांची भरती 31 डिसेंबर पूर्वी करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (home minister dilip walse patil) यांनी केली आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांची, त्यानंतर उर्वरित 7 हजार पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, पोलीस दलातील भरतीसोबतच वळसे पाटील यांनी मृत पोलिसांच्या मुलांच्या नोकरीबाबतही मोठे वक्तव्य केले. कोविडमध्ये मृत्यू झालेल्या पोलिसांच्या मुलांना नोकरी देण्याचे धोरण त्यांनी यावेळी स्पष्ट आहे.

तसेच, नुकसान भरपाई म्हणून 50 लाख देण्याचे काम बर्‍याच ठिकाणी पूर्ण झाले असून, उर्वरित राहिलेल्यांनाही लवकर मदत दिली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय, पोलीस कर्मचार्‍यांना कर्ज मिळत नाही. ते वाटप करण्याच्या दृष्टीने विचार केला जात असून, कर्जासाठी मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com