
कोल्हापुर | Kolhapur
कोल्हापुरातील कणेरी मठातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील देशी गाईंना शिळे अन्न खाऊ घातल्याने तब्बल 50 ते 54 गायींचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या लोकोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. याठिकाणी जनावरांचे प्रदर्शन सुरू आहे त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांना आणण्यात येत आहे.
श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनामुळे देशी जाती-प्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार असल्याचीही यामध्ये माहिती देण्यात आली.
गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मीळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथमच त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाबरोबर प्रत्येक जनावरांच्या विविध गटांत भव्य स्पर्धा देखील ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी 69 लाखांची बक्षिसे देण्यात येतील. जनावरांच्या सौंदर्य स्पर्धेत सर्वात सुंदर जनावरांना 21 हजारांपासून ते लाखापर्यंतची बक्षिसे देण्यात येतील.