5 हजार तरुणी होणार सायबर सखी
महाराष्ट्र

5 हजार तरुणी होणार सायबर सखी

राज्य महिला आयोगाचा डिजिटल स्त्री शक्ती उपक्रम

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई |Mumbai - सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती नसल्याचा फटका अनेक तरुणींना बसला आहे. यापुढे असे होवू नये यासाठी 100 वेबिनार मधून राज्याच्या 10 शहरातील 5 हजार तरुणींना सायबर सखी Cyber Sakhi म्हणून प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग Maharashtra State Commission for Woman (MSCW) आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल स्त्री शक्ती Digital Stri Shakti उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्राशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन उद्या 21 जुलैला सकाळी 11 वाजता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे, फसवणूक यातही वाढ होत आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी डिजिटल स्त्री शक्ती उपक्रम सुरु होत आहे. 16 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरुणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

Deshdoot
www.deshdoot.com