ठाण्यात दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

ठाण्यात दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

ठाणे / Thane - ठाणे परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात एका घरावर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर चार घरांचे नुकसान झाले आहे. बचाव पथकाने आतापर्यंत चार जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. तर काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. काही नागरिक घरात अडकल्याची शक्यता असून घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. मृतांमध्ये 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाने गेल्या 48 तासांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अनेकांचा बळी घेतला आहे. चेंबूरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना ताजी असताना अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती ठाण्याच्या कळवा शहरात झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरावर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज आला. हा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घराबाहेर आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com