
मुंबई | Mumbai
पावसाळ्याचे दिवस सुरु झाले की विजेचे धक्के लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. विजेच्या धक्याने अनेकांवर मृत्यू होण्यासारखी दुर्दैवी घटना ओढावत असते. अशीच एक दुर्दैवी घटना गोंदीया जिल्ह्यातील तिरोडा येथे घडली आहे....
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील (Gondia) तिरोडामधल्या (Tiroda) सरांडी येथील खेमराज साठवणे यांच्या घरगुती विहिरीतील मोटार पंप खराब (Motor Pump) झाला होता. विहिरीत उतरल्यानंतर सर्वात प्रथम त्यांना विजेचा शॉक लागला. त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेले सचिन भोंगाळे आणि प्रकाश भोंगाळे या काका पुतण्यासह महेंद्र राऊत याचा देखील विहीरीत उतरताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेमुळे सरांडी गावावर (Sarandi village) शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास प्रशासनाने (Administration) सुरु केला आहे.