करोना बाधित
करोना बाधित
महाराष्ट्र

मागील २४ तासांत ३०३ नवे पोलीस करोना बाधित

५ जणांचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई | Mumbai

करोना व्हायरस संसर्गाचा विळखा बसलेल्या महाराष्ट्र पोलिस दलात आजही करोना बाधित नवे रुग्णांची भर पडली आहे. मागील २४ तासांत ३०३ पोलिसांना करोनाची लागण झाली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे पोलिस दलातील करोना बाधितांचा आकडा १३ हजार १८० इतका झाला आहे. त्यापैकी दोन हजार ३८९ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर एकूण १३६ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

करोना व्हायरसच्या संकट काळात राज्यातील नागरिकांची सुरक्षा आणि कायदा, नियमांची सुव्यवस्था जपणासाठी पोलिसांनी जीवाची बाजी लावून कार्य करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com