परतीच्या पावसामुळे 28 जणांचा मृत्यू

आर्थिक नुकसानीसह जीवितहानी
परतीच्या पावसामुळे 28 जणांचा मृत्यू

मुंबई -

परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, कोकणात थैमान घातले आहे. हाताशी आलेलं पीक

पाण्याखाली गेलं. पावसामुळे आर्थिक नुकसान झालंच पण सोबतच मोठी जीवितहानी देखील झाली. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यात एकूण 28 जणांचा मृत्यू झाला आहे असून एक जण बेपत्ता आहे.

आतापर्यंत जवळपास 29 हजार 292 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. यात पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 17 हजार नागरिकांचा समावेश आहे. तर 57 हजार 354 हेक्टर क्षेत्रातील पीक जमीनदोस्त झालं आहे. याशिवाय 2319 घरांची पडझड किंवा मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात 513 जनावरं नदीला आलेल्या पुरात वाहून गेली आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com