करोना
करोना
महाराष्ट्र

राज्यातील २६४ पोलिसांना करोनाची लागण

मागील २४ तासातील आकडेवारी

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई | Mumbai

राज्यात करोना व्हायरसची स्थिती आटोक्यात येईपर्यंत लोकांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणारे महाराष्ट्र पोलिस मात्र कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

मागील २४ तासांत २६४ महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून ३ जण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आतापर्यंत एकूण ११ हजार ३९२ महाराष्ट्र पोलिस करोना बाधित झाले असून १२१ जण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आतापर्यंत ९१८७ महाराष्ट्र पोलिसांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली असून २०८४ पोलिसांवर सद्य घडीला उपचार सुरु आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com