धक्कादायक!! २४ तासांत २४ मृत्यू; नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव

धक्कादायक!! २४ तासांत २४ मृत्यू;  नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव

नांदेड | Nanded

ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात केवळ एकाच रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आरोग्य विभागावर भरपूर टीका झाली होती. या घटनेला एक महिना उलटत नाही तोच नांदेडमध्ये अशीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाले (24 Patients Death) आहेत.

नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. तर, सर्पदंश आणि विषबाधेमुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय.

धक्कादायक!! २४ तासांत २४ मृत्यू;  नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव
India Alliance March : मुंबईत इंडिया आघाडीची पदयात्रा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची दररोजची ओपीडी साधारणत: दोन हजारांवर आहे. या ठिकाणी नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम अन् शेजारील तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्णांची संख्या वाढत असताना औषधींच्या तुटवड्याचा विषयही गंभीर होत चालला आहे. आजही रुग्णांना बाहेरून औषधी आणण्याचा सल्ला दिला जातो. त्यातच गेल्या २४ तासांत रुग्णालयात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ६ पुरुष आणि ६ स्त्रीजातीच्या नवजात बालकांचा समावेश आहे.

रुग्णालयात अत्यावश्यक औषधी नसल्यामुळे शेजारील जिल्ह्याच्या रुग्णालयात एक्स्पायरी डेट संपत असलेल्या औषधींचा साठा गरज पडल्यास मागवून घेण्यात येत आहे. नेत्यांच्या वाढदिवशी औषधी भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाने खरेदी केलेल्या ४० लाखांच्या औषधींचा साठा संपत आला आहे. दरम्यान आता अशीच घटना नांदेडमध्ये घडली आहे. यावर एकनाथ शिंदे सरकार काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com