राज्यात ७२ तासात २३७ पोलीस कर्मचारी करोनाबाधित

आकडा १०४० वर
महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र पोलीस

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसागणिक करोनाच्या रुग्णांसह बळींचा आकड्यात प्रचंड वाढ झाली आहे.

कोविड वॉरिअर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता करोनाची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. याच दरम्यान आता गेल्या ७२ तासात महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी २३७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात पोलीस दलातील एकूण १०४० कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर ६४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य अहोरात्र पार पाडत आहेत. तसेच वयाच्या ५५ वर्षापेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात काम करण्यास परवानगी नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com