Corona
Corona
महाराष्ट्र

राज्यात आज 211 पोलिस करोना पॉझिटिव्ह

आतापर्यंत 93 पोलिसांचा मृत्यू

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई |Mumbai -

राज्यात आज 211 पोलिसांचे Police करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह Corona test report positive आले आहेत. तर 157 पोलिसांनी करोनावर मात केली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत 93 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 191 पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांत पोलिसांना करोनाची लागण होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

आतापर्यंत 8 हजार 483 पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 157 पोलीस शनिवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांमध्ये 660 पोलीस अधिकारी आणि 5 हजार 811 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 210 पोलीस अधिकार्‍यांसह 1 हजार 709 पोलिसांवर उपचार सुरु आहे. शनिवारी 211 पोलिसांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना जवळच्या खाजगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

करोनामुळे आतापर्यंत राज्यात 93 तर मुंबईत 49 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 93 पोलिसांमध्ये सात पोलीस अधिकारी आणि 86 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत 317 पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाला असून त्यात 881 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com