लॉकडाऊनमध्ये १०० नंबरवर तब्बल 'इतके' कॉल

राज्यात कोविडसंदर्भात २ लाख ७० हजार गुन्हे दाखल
लॉकडाऊनमध्ये १०० नंबरवर तब्बल 'इतके' कॉल

मुंबई | Mumbai

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७० हजार ५७१ गुन्हे दाखल झाले आहेत.

३७ हजार ४२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध गुन्ह्यांसाठी २८ कोटी ४० लाख ६० हजार २६४ रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २६ सप्टेंबर या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३६४ (८९५ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार २९३

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७

जप्त केलेली वाहने – ९६, ४३०

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील

२१७ पोलीस व २४ अधिकारी अशा एकूण २४१ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.

पोलिसांना करोनासंदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

करोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com