धक्कादायक घटना! एकाच रात्री रुग्णालयातील १७ रुग्णांचा मृत्यू

ठाण्याच्या कळवा येथील हॉस्पीटलमधील घटना
धक्कादायक घटना! एकाच रात्री रुग्णालयातील १७ रुग्णांचा मृत्यू

ठाणे | Thane

ठाणे महानगरपालीकेच्या कळवा (Kalva) मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chatrapati Shivaji Maharaj Hospital) अनागोंदी कारभार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू (17 Patients Dead ) झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या रुग्णालयामध्ये एकाच रात्रीमध्ये उपचार सुरु असलेल्या १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील अंदोगोंदी कारभार वारंवार समोर येत आहे.

एका रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शुक्रवारी या रुग्णालयात उपचार न मिळाल्याने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नसून रुग्णांना वेळेवर औषध दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.

धक्कादायक घटना! एकाच रात्री रुग्णालयातील १७ रुग्णांचा मृत्यू
कचऱ्याची विल्हेवाट लावताना कंपनीत भीषण स्फोट; एकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने तर काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र सिव्हिल रुग्णालय बंद झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व रुग्ण इथेच येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे.

कळवा रुग्णालयातील रुग्णांची संख्या मोठी आहे. पावसामुळे साथीचे आजार वाढले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे. परिणामी प्रशासनावर ताण येत असल्याने रुग्णांना वेळेवर अटेंड करणे कठिण होत आहे. त्यातच अनेक रुग्ण गंभीर आजाराचे आहेत. काही रुग्ण शेवटच्या क्षणी रुग्णालयात येतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठिण जाते. प्रत्येक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पण मनुष्यबळाच्या अभावी प्रत्येक रुग्णाला वेळ देता येत नसल्याने उपचारा अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

धक्कादायक घटना! एकाच रात्री रुग्णालयातील १७ रुग्णांचा मृत्यू
शरद पवार-देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; दोघे काय बोलणार? अवघ्या राज्याचे लक्ष

शुक्रवारी पाच जणांचा मृत्यू

शुक्रवारी या रुग्णालयात उपचार न मिळाल्याने ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यातच आता आणखी १७ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नसून त्यांना वेळेवर औषध दिले जात नसल्याचा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वी आव्हाडांनी ट्विट करत रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. रुग्णालयात गेलो असता,रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो,तळपायाची आग मस्तकात गेली, असे म्हटले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com