आई मोठ्या भावालाच जास्त जीव लावते; १५ वर्षीय मुलाची पाचव्या मजल्यावरून उडी
मुंबई | Mumbai
भाऊ आणि आईसोबत झालेल्या किरकोळ वादातून पंधरा वर्षीय मुलाने अचानक पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, एका पंधरा वर्षीय मुलाने मालाड पूर्वेकडील कुरार आप्पा पाडा शिवपार्वती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली. ज्यावेळी त्याने उडी मारली त्यावेळी त्याच्यासमोर त्याची आई आणि मोठा भाऊ देखील उपस्थित होता.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
मुलगा उशिरा उठला आणि अंघोळीसाठी स्नानगृहात गेला. त्यावेळी त्याची आई त्याच्या मोठ्या भावाला जवळ घेऊन समजावत होती. आपल्यापेक्षा मोठ्या भावालाच आई जास्त जीव लावते, असा समज करून त्याने आई व भावासोबत वाद घातला असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनतर त्याने पाचव्या मजल्यावरून उडी घेतल्याचे समजते.
जखमी मुलाला ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी कुरार पोलीस अधिक तपास करत आहे.