मुंबई महानगर क्षेत्रात १४ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार

मुंबई महानगर क्षेत्रात १४ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रात उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.

ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होतील, असे शिंदे यांनी सांगितले.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यासाठी संस्थांची निवड करून त्यांना कार्यादेशही देण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

हवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्याला जाईल. साधारणतः एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

महापालिका आणि ऑक्सिजन प्लांट

ठाणे- ३, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई प्रत्येकी २ तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मिरा- भाईंदर, वसई -विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास प्रारंभ झाला आहे.

'सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन उपयुक्त ठरेल'

एकनाथ शिंदे , नगरविकास मंत्री

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com