धक्कादायक ! राज्यात आजपर्यंत १३९ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यु

आतापर्यंत १३ हजार ७१६ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे
धक्कादायक ! राज्यात आजपर्यंत १३९ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यु

मुंबई | Mumbai

देशासह राज्यात करोनाचा प्रभाव वाढतच आहे. गेल्या २४ तासात करोनामुळे राज्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, तर एकूण १२० पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. (coronavirus cases in maharashtra police)

राज्यात आतापर्यंत १३९ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये १५ पोलीस अधिकारी तसेच १२४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत १३ हजार ७१६ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. सध्या राज्यात २ हजार ५२८ पोलीस कर्मचारी उपचार घेत आहे. आतापर्यंत राज्यात ११ हजार ०४९ पोलीस हे करोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com