धक्कादायक! ऑनलाईन चॅलेंजने घेतला १३ वर्षीय बालकाचा जीव

धक्कादायक! ऑनलाईन चॅलेंजने घेतला १३ वर्षीय बालकाचा जीव

नागपूर | Nagpur

मोबाईलवर व्हिडिओ पाहून तशी कृती करण्याच्या नादात 13 वर्षीय बालकाचा गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अग्रण्य बारापात्रे असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे...

सोमवारी गच्चीवरील शिडीला गळफास घेतलेल्या स्थितीत अग्रण्यचा मृतदेह आढळून आला होता. मोबाईलवरील एक चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात अग्रण्याच जीव गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

धक्कादायक! ऑनलाईन चॅलेंजने घेतला १३ वर्षीय बालकाचा जीव
दे दणादण! मुलाने चोरांनाच धू-धू धुतलं; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

अग्रण्य हा इयत्ता आठवीतील विद्यार्थी होता. लाठी-काठी चालवण्यात अग्रण्यने प्रावीण्य मिळवले होते. अग्रण्य हा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होता. सोशल मिडीयावरील पूर्ण करताना अग्रण्याचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे. अग्रण्यने पाहिलेल्या व्हिडिओत एखादी कृती करायचे आव्हान स्वीकारायचे व ते पूर्ण करायचे प्रयत्न केले जातात. हेच चॅलेंज अग्रण्यने घेतले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com