SSC HSC Exams 2022 : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर वेळापत्रक

SSC HSC Exams 2022 : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर वेळापत्रक

मुंबई | Mumbai

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. च्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. ४ मार्च ते ३० मार्च या दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत, तर १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे.

दहावीच्या परिक्षेचं वेळापत्रक

१५ मार्च- प्रथम भाषा

१६ मार्च- द्वितीय वा तृतीय भाषा

२१ मार्च- हिंदी

२२ मार्च- संस्कृत, उर्दू, गुजराती आणि इतर द्वितीय आणि तृतीय भाषा

२४ मार्च- गणित भाग-१

२६ मार्च- गणित भाग-२

२८ मार्च- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १

३० मार्च- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २

१ एप्रिल- सामाजिक शास्त्र पेपर १

४ एप्रिल- सामाजिक शास्त्र पेपर २

बारावीच्या परिक्षेचं वेळापत्रक

४ मार्च - इंग्रजी

५ मार्च - हिंदी

७ मार्च - मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ

८ मार्च - संस्कृत

१० मार्च - फिजिक्स

१२ मार्च - केमिस्ट्री

१४ मार्च - माथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स

१७ मार्च - बायोलॉजी

१९ मार्च - जियोलॉजी

९ मार्च- ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट

११ मार्च - सेक्रेटरीयल प्रॅक्टिस

१२ मार्च - राज्यशास्त्र

१२ मार्च - अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर १

१४ मार्च - अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर २

१९ मार्च - अर्थशास्त्र

२१ मार्च - बुक किपिंग अँड अकाउंटन्सी

२३ मार्च - बँकिंग पेपर - १

२५ मार्च - बँकिंग पेपर - २

२६ मार्च - भूगोल

२८ मार्च - इतिहास

३० मार्च - समाजशास्त्र

दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने (ऑफलाईन) होतील. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ याकालावधीत पार पडेल. दहावीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असेल. करोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील.

ओमिक्रॉनसंदर्भात राज्य शासन खबरदारी घेत आहे. त्याबाबत राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीची परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेता आल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com