पगार 10 हजार अन् इन्कम टॅक्सने धाडली तब्बल 1 कोटी 14 लाखांची नोटीस; काय आहे प्रकरण?

पगार 10 हजार अन् इन्कम टॅक्सने धाडली तब्बल 1 कोटी 14 लाखांची नोटीस; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

कल्याण (Kalyan) येथे सुरक्षा रक्षक (Security guard) म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाकडून 1 कोटी 14 लाखांची नोटीस पाठवण्यात आली आहे. या सुरक्षा रक्षकाचा पगार केवळ दहा हजार रुपये आहे. नोटीस (Notice) मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे...

चंद्रकात वरक (५६) असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबत त्यांनी इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाकडे चौकशी केली. त्यावेळी विभागाकडून वरक यांच्या पॅनकार्डच्या परदेशातून ही खरेदी केल्याचा ठपका ठेवला आहे. या घटनेनंतर वरक यांनी सरकारने लक्ष घालून माझी यातून सुटका करावी तसेच याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

कल्याणातील (Kalyan) ठाणकरपाडा परिसरात जैन चाळीत ५६ वर्षीय चंद्रकात वरक आपल्या बहिणीसह राहतात. चंद्रकात वरक हाउस कीपिंगमध्ये, सुरक्षा रक्षक म्हणून तर कधी कुरीअर बॉय म्हणून काम करतात.

पगार 10 हजार अन् इन्कम टॅक्सने धाडली तब्बल 1 कोटी 14 लाखांची नोटीस; काय आहे प्रकरण?
सिन्नर : 'त्या' खुनातील तरुणाला बेड्या; वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून केली होती हत्या

यातून जेमतेम मिळणाऱ्या १० ते १५ हजार रुपये पगारावर उदरनिर्वाह करतात. मात्र बुधवारी त्यांना आयकर विभागाने १ कोटी १४ लाख रुपयाची नोटीस धाडली. कोट्यवधीची नोटीस पाहून त्यांना धडकी भरली.

पगार 10 हजार अन् इन्कम टॅक्सने धाडली तब्बल 1 कोटी 14 लाखांची नोटीस; काय आहे प्रकरण?
दिंडोरीतील 'त्या' दरोडयाची उकल; आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर जेरबंद

त्यांनी आयकर कार्यालयात धाव घेत विचारणा केली असता आयकर अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या पॅनकार्ड व कागदपत्राचा वापर करून चीनमधून काही वस्तूची खरेदी करण्यात आल्याचे आणि त्यावरील कर भरणा केलेला नसल्याचे सांगितले. या प्रकरणातून संबंधित विभागाने, सरकारने माझी सुटका करावी, अशी मागणी वरद यांनी केली आहे.

पगार 10 हजार अन् इन्कम टॅक्सने धाडली तब्बल 1 कोटी 14 लाखांची नोटीस; काय आहे प्रकरण?
पत्नीला प्रसूतीगृहाकडे नेताना कारने घेतला अचानक पेट; दाम्पत्याचा होरपळून मृत्यू
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com